केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या भेटीत माळशिरस पंचायत समितीचे मा. उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील यांची विशेष उपस्थिती…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा व निवेदन सादर….
दिल्ली (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या समवेत माळशिरस तालुक्यासह सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी माळशिरस तालुका विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या समवेत युवा उद्योजक अमोल शेठ यादव उपस्थित होते.
माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी उपसभापती युवा नेते किशोरभैय्या सुळ पाटील यांच्या उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील प्रमुख रस्त्यांचा विकास महामार्ग प्रकल्पाची मंजुरी, प्रलंबित कामांच्या त्वरित पूर्ण या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रासह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधव व जनतेस दळणवळणाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्रीय रस्ता निधी ( C R F ) अंतर्गत विविध रस्ता विकास कामांना मंजुरी मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले. माननीय ना. नितीनजी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विविध विकास कामांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांना माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी उपसभापती युवा नेते किशोरभैया सुळ पाटील यांची विशेष ओळख करून देऊन राजकीय व सामाजिक कार्याची माहिती सांगितली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



