आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पत्राला भाजप महायुतीच्या सरकारने दिली केराची टोपली…

लोकप्रिय दमदार मा. आ. राम सातपुते यांच्या शिफारशीने अकलूज नगरपरिषदेला श्री. सचिन पाटील यांच्या रूपाने मिळाला नव्याने मुख्याधिकारी..
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आ. राम सातपुते यांनी पत्रान्वये श्री. सचिन पाटील यांची अकलूज नगर परिषदेवर मुख्याधिकारी गट अ निवडश्रेणी यांच्या पदस्थापनेत अंशतः बदल करून नियुक्ती करावी असे पत्र दिले होते. लाडके मुख्यमंत्री यांनी सदर पत्रावर शेरा मारलेला असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी आदेशान्वये अकलूज नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी श्री. सचिन पाटील यांची नियुक्ती केलेली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी अन्य व्यक्तीचे नाव दिलेले होते. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पत्राला भाजप महायुतीच्या सरकारने दिली केराची टोपली, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप व महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपचेच विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेतलेली असल्याची केंद्रीय व राज्यातील वरिष्ठांकडे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी तक्रारी केलेल्या होत्या. केंद्रातील व राज्यातील नेतृत्वाने गांभीर्याने दखल घेतलेली पाहावयास मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आढावा बैठक लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सदरच्या बैठकीमध्ये विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार असताना सुद्धा त्यांना निमंत्रण दिलेले नव्हते. भाजपच्या प्रमुख कार्यक्रमातून वगळले जात आहे.
अकलूज नगरपरिषदेला मोहिते पाटील यांचे नाक समजले जाते मात्र, मोहिते पाटील यांच्या नाकावर टिचून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विश्वासू व भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान माजी आमदार राम सातपुते यांनी श्री. सचिन पाटील यांची नियुक्ती करून घेतलेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व लोकप्रिय दमदार मा. आ. राम सातपुते यांच्यामधील गुरु शिष्याचं नातं किती दृढ आहे, याचा प्रत्यय माळशिरस तालुक्यातील जनतेला कायमच आलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



