धन्यवाद देवाभाऊ !! अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी माळशिरस तालुक्यात 63 कोटी 29 लाखाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार – मा. आ. राम सातपुते.

लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे शेतकऱ्यांच्या वतीने मा. आ. राम सातपुते यांनी आभार मानले…
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झालेले होते. मका, बाजरी, मिरची, कांदा, डाळिंब अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला होता. त्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात दिलेला आहे. माळशिरस तालुक्यात अतिवृष्टी कमी होती मात्र, पावसाची संततधार असल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालेले होते. पिकांची मुळे कुजलेली होती.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बिहार दौऱ्यावर होते. तात्काळ दौरा रद्द करून तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर व अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कण्हेर गावातील उपस्थित शेतकऱ्यांसमोर फोन लावून तालुक्यातील परिस्थिती सांगितलेली होती.
मुख्यमंत्री यांनी निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासित केलेले होते. त्याप्रमाणे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना 63 कोटी 29 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे..
यंदाच्या खरीपामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले होते. या संकटाशी सामना करण्याचे बळ देण्यासाठी माजी आमदार राम सातपुते यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन परिस्थिती जाणून घेत मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिलेली होती. महसूल प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होते.


अंतिम टप्प्यात पंचनामे आलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे दिवाळी असताना सुद्धा महसूल प्रशासनाचे अधिकारी शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी रात्रंदिवस खात्यावर पैसे पाठवण्यासाठी कामकाज सुरू आहे. लवकरच माळशिरस तालुक्यातील 63 कोटी रुपये बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे विशेष आभार म्हणून माळशिरस तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व तालुक्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या मा. आ. राम सातपुते यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



