पालकमंत्री जयकुमार गोरे, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत मा. आ. राम सातपुते यांच्या मधुर मिलन मंगल कार्यालय नातेपुते येथे दिवाळी स्नेह मेळाव्याचे आयोजन…

माळशिरस तालुक्यातील सर्व स्नेहजन, मित्रपरिवार आणि मान्यवर जनतेस आपुलकीचे बंध अधिक दृढ व्हावे या हेतूने दिवाळी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन …
नातेपुते (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आ. आरोग्यदूत राम सातपुते यांचा मधुर मिलन मंगल कार्यालय, नातेपुते येथे शनिवार दि. 25 ऑक्टोंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता दिवाळी स्नेह मिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
माळशिरस तालुक्यातील सर्व स्नेहजन, मित्रपरिवार व मान्यवर जनतेस आपुलकीचे बंध अधिक दृढ व्हावे या हेतूने दिवाळी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी तालुक्यातील सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे दिवाळी स्नेह मिलन आयोजन समितीच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आलेले आहे…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अकलूज नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. दिवाळी स्नेह मिलन मेळाव्यामध्ये जयकुमार गोरे, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, राम सातपुते राजकीय ॲटम बॉम्ब कशा पद्धतीने फोडतील याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
सदरचा स्नेह मेळावा माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी होणार होता परंतु, दोन दिवसांमध्ये वरूणराजाचे आगमन सुरू असल्याने स्नेह मेळाव्यात नेते व कार्यकर्त्यांना अडचण येऊ नये, यासाठी श्रीराम बंगला या ठिकाणी होणारा स्नेह मेळावा मधुर मिलन मंगल कार्यालय नातेपुते येथे होणार आहे, सर्वांनी याची विशेष नोंद घ्यावी….
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



