जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या समवेत ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे..

मा. आ. राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी मोहिते पाटील गटाचे निष्ठावान ज्येष्ठ नेते भाजपच्या वाटेवर…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जत विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळेस अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व माळशिरस तालुक्याचे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे यांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतलेले होते.
माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये 40 वर्षांपासून मोहिते पाटील परिवाराशी एकनिष्ठ व निष्ठावान असणारे मोहिते पाटील गटाचे जेष्ठ नेते भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
मोहिते पाटील यांच्या राजकारणामध्ये माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे यांचा सिंहाचा वाटा आहे. तालुक्यामध्ये धनगर समाजाचा स्वच्छ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गणपत तात्या वाघमोडे भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर निश्चितपणे माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर गणपत तात्या वाघमोडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. अद्यापपर्यंत भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. जस्ट वेट अँड वॉच…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



