चि. हनुमंत घुले, वटपळी व चि. सौ. कां. नम्रता वाघमोडे, महाळुंग आणि चि. सौ. कां. प्रियांका घुले, वटपळी व चि. आप्पासाहेब खरात, वटपळी यांचा शाही शुभविवाह सोहळा….

श्री.आबासाहेब ज्ञानदेव घुले
श्रीनाथ उद्योग समूह
रा. वटपळी ता. माळशिरस.
माळशिरस (बारामती झटका)
श्री. ज्ञानदेव खंडू घुले यांचे नातू व श्री. दत्तात्रय ज्ञानदेव घुले रा. वटपळी, ता. माळशिरस यांचे जेष्ठ चि. हनुमंत व स्व. मारुती भिवा वाघमोडे यांची नात व श्री. देविदास मारुती वाघमोडे रा. महाळुंग (हाकेवस्ती), ता. माळशिरस यांची तृतीय कन्या चि. सौ. कां. नम्रता आणि श्री. ज्ञानदेव खंडू घुले यांची नात व श्री. दत्तात्रय ज्ञानदेव घुले रा. वटपळी, यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. प्रियांका व स्व. रामु कृष्णा खरात यांचे नातू व श्री. महादेव रामू खरात रा. वटपळी यांचे ज्येष्ठ चि. आप्पासाहेब यांचा शनिवार दि. 22/11/2025 रोजी दुपारी 01 वाजून 05 मिनिटे या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस अकलूज रोड, 61 फाटा, ता. माळशिरस येथे शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे श्रीनाथ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. आबासाहेब उर्फ मल्हारी ज्ञानदेव घुले व समस्त घुले परिवार वटपळी यांच्या वतीने शुभ कार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
शुभमंगल प्रसंगी पारिजातकाच्या वर्षावाप्रमाणे अक्षताची उधळण आणि स्नेहमय आशीर्वादाची बरसात व्हावी, यासाठी आपणांस आग्रहाचे निमंत्रण आपले नम्र सौ. सुमन व श्री. ज्ञानदेव खंडू घुले, सौ. छाया व श्री. दत्तात्रय ज्ञानदेव घुले, सौ. लता व श्री. मल्हारी (आबा) ज्ञानदेव घुले व समस्त घुले परिवार यांच्या वतीने शुभ कार्यास उपस्थित राहण्यास आमंत्रण आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते निमंत्रण अथवा आमंत्रण न मिळाल्यास हेच आमंत्रण समजून येण्याची विनंती समस्त घुले, वाघमोडे व खरात परिवारांच्या वतीने आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



