सर्जेराव महादेव पवार यांचे दुःखद निधन

वाघोली गावचे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सुरेश पवार यांना पितृशोक
वाघोली (बारामती झटका)
वाघोली, ता. माळशिरस येथील वाघोली गावचे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष श्री. सुरेश सर्जेराव पवार यांचे वडील सर्जेराव महादेव पवार यांचे वयाच्या 97 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. 25 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांची पश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, तीन विवाहित मुली सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर व वाघोली तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश सर्जेराव पवार यांचे ते वडील होते.
स्व. सर्जेराव पवार तिसऱ्या दिवसाचा विधी म्हणजे अस्थी विसर्जन दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी वाघोली येथील स्मशानभूमीत सकाळी 7.00 वाजता होणार आहे.
स्व. सर्जेराव पवार यांच्या परिवाराला या दु:खातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



