रत्नागिरी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अण्णासाहेब कदम माळशिरस येथील हॉटेल नंदनवन उद्घाटनास उपस्थित…

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य नंदनवन हॉटेलचे मालक संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख यांनी अण्णासाहेब कदम यांचा सन्मान केला..
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहराच्या वैभवामध्ये भर घालणारे नंदनवन प्युअर व्हेज हॉटेलचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना. दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री रामदासभाई कदम यांचे बंधू व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. योगेश कदम यांचे चुलते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती श्री. अण्णासाहेब कदम आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार संजय कदम उपस्थित होते.
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य नंदनवन हॉटेलचे मालक संयमी नेतृत्व तुकाराम भाऊ देशमुख यांनी अण्णासाहेब कदम यांचा सन्मान केला. यावेळी इंदापूर खरेदी विक्री संघाचे चेअरमन युवानेते प्रदीपमामा जगदाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ हिवरकर, भानुदास सालगुडे पाटील, शिवसेनेचे नेते अशोकराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



