घुलेनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शशिकांत घुले यांची बिनविरोध निवड

जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष पदी विद्या सातपुते यांची निवड
घुलेनगर (बारामती झटका)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुलेनगर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी श्री. शशिकांत ज्ञानदेव घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर, उपाध्यक्ष पदी सौ. विद्या अनिल सातपुते यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल दोघांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी जिगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ सुळे. पानिव घुलेनगरचे माजी उपसरपंच प्रताप घुले, मुख्याध्यापिका नाईकनवरे मॅडम, शिक्षक महामुनी सर, माजी अध्यक्ष शिवाजी हनुमंत घुले, अनिल घुले, शिवाजी कुंडलीक घुले, आनंद ठवरे, राजेंद्र वाघ, विजय बुधनवर, खवळे मॅडम, क्षीरसागर मॅडम, कामाबाई घुले, मिनाक्षी विरकर, साठे मावशी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुलेनगर शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष श्री. शशिकांत घुले आणि उपाध्यक्ष सौ. विद्या सातपुते यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



