भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबीन यांना शुभेच्छा देण्याकरता माळशिरसच्या पाटलांचा नातू पोहोचला दिल्लीला…

दिल्ली (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे भारत देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबीन यांची नव्याने नियुक्ती केलेली आहे. त्यांच्यावर देशातून व राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायत हद्दीतील मल्हार साखर कारखान्याच्या चेअरमन सौ. साधनादेवी व श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांचा नातू उगवता तारा शिवेंद्रराजे देवकाते पाटील दिल्लीच्या प्रदेश कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेला आहे.
माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांच्या विचारांचा वसा व वारसा जोपासत असणारे युवानेते प्रितमसिंह काशिनाथ देवकाते पाटील यांची राजकीय व सामाजिक वाटचाल सुरू आहे. स्वर्गीय शिवाजीभाऊ यांचे विचार घेऊन समाजामध्ये देवकाते पाटील परिवार यांची वाटचाल सुरू आहे. दिल्लीच्या तख्तावर माळशिरसचा उगवता तारा शिवेंद्रराजे यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नबीन यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात जाऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



