राजकुमार हिवरकर पाटीलांकडे मोहोळ विधानसभा क्षेत्राची निवडणूक जबाबदारी

मोहोळ (बारामती झटका)
शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असलेले सोलापूर जिल्हाप्रमुख ओबीसी राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडे शिवसेना उपनेते माजी आमदार संजय कदम यांनी सुरू असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मोहोळ विधानसभा क्षेत्र निवडणूक संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.
मोहोळ विधानसभा क्षेत्रातील सुरू असलेल्या निवडणुकीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती उमेदवारांना मार्गदर्शन करणे, उमेदवारांचा प्रचार करणे, तसेच शिवसेना पक्ष, संघटना वाढविण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचे त्यांना पत्र देऊन निवडणूक संपर्कप्रमुख पदाची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली.

यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार संजय कदम, अण्णा कदम साहेब शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



