ताज्या बातम्याराजकारण

निमगाव जिल्हा परिषद गटात आणि निमगाव व गोरडवाडी पंचायत समिती गणात भाजपचे कमळ फुलणार…

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती गोरडवाडी गावचे ज्येष्ठ नेते स्व. माणिकराव कर्णवर पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या सौ. चांगुणाबाई साहेबराव गोरड यांच्या रूपाने गोरडवाडीला पुन्हा उपसभापती पद मिळणार…

गोरडवाडी (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांनी गोरडवाडी येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराच्या वेळी गोरडवाडी गणातील सर्व मतदारांना जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. ज्योती विनायक ठवरे, सौ. चांगुणाबाई साहेबराव गोरड यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. भारतीय जनता पार्टीची निश्चितपणे पंचायत समितीवर सत्ता येणार आहे. गोरडवाडी गावाला उपसभापतीपदाचा मान देणार असल्याचे सांगितल्याने माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती गोरडवाडी गावचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय माणिकराव पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या सौ. चांगुणाबाई साहेबराव गोरड यांच्या रूपाने गोरडवाडी गावाला पुन्हा उपसभापती पद मिळणार आहे…

सौ. चांगुणाबाई साहेबराव गोरड यांचे माहेर गोरडवाडी येथील आहे व सासर सुद्धा गोरडवाडी परिवारामध्ये आहे. त्यामुळे चांगुणाबाई यांचा लहानपणापासून गावांमध्ये असलेला जनसंपर्क चांगुणाबाई नावातच चांगुणा नाही तर चांगल्या पद्धतीने चांगुलपणाने वागलेल्या असल्याने समाजामध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे. सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. सासरचा आणि माहेरचा वारसा त्यांना लागणार आहे.

स्वर्गीय माणिकराव कर्णवर पाटील निश्चितपणे आपल्या लेकीला उपसभापती पदावर विराजमान करण्यासाठी निश्चितपणे स्वर्गातून आशीर्वाद देतील. योगायोगाने स्वर्गीय माणिकराव बापू यांनी ज्या गावाचे प्रतिनिधित्व केले तीच गावे लाडक्या लेकीच्या मतदार संघात येत आहेत. गोरडवाडी, मांडकी, मोटेवाडी, तरंगफळ, गारवाड, पठाणवस्ती, चांदापुरी, झिंजेवस्ती अशी आठ गावे येत आहेत. उमेदवारी कर्णवर पाटील घराण्यातील लेकीला मिळाल्यानंतर श्री. श्री सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्यासह कर्णवर परिवारातील सर्व सदस्य प्रचाराला लागलेले आहेत. गोरडवाडी गावातील गट तट विसरून आपल्या गावची लेक व सून असल्याने गोरडवाडी ग्रामस्थ सुद्धा प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत..

पंचायत समिती गणातील पठाणवस्ती गावचे लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच एजाज पठाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. चांदापुरी गावचे थेट जनतेतील सरपंच जयवंतराव सूळ यांनीही समर्थन दिलेले आहे. चांदापुरी येथील चांदापुरी पतसंस्थेचे चेअरमन ज्येष्ठ नेते भजनदास चोरमले, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते नईमखान पठाण, यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे प्रचार करीत आहेत. निमगाव पंचायत समिती गणामध्ये सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे युवा नेते श्री. किरण वसंतराव पाटील यांच्या प्रचाराची धुरा माळशिरस पंचायत समितीचे तीन टर्म सदस्य असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते के. के. पाटील यांच्यासह निमगाव, खुडूस, डोंबाळवाडी, झंजेवाडी, अशा पाच गावातील नेते व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये अनेकांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे निमगाव जिल्हा परिषद गटात आणि निमगाव व गोरडवाडी पंचायत समिती गणात भाजपचे कमळ फुलणार अशी मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button