पदवी पशु वैद्यकीय व पशु विज्ञान महाविद्यालयाकरिता वाटाघाटीद्वारे भुसंपादनाची थेट खरेदी प्रक्रिया पूर्ण

बाधितांना ३ कोटी रुपयाहून अधिक रक्कम धनादेशाद्वारे अदा – उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर
बारामती (बारामती झटका)
उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत मौजे कऱ्हावागज येथील २२.३० हेक्टर आर क्षेत्र नवीन पदवी पशु वैद्यकीय व पशु विज्ञान महाविद्यालय स्थापनेकरिता खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने भुसंपादनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
मौजे कऱ्हावागज येथील संपादन होणाऱ्या गट नंबर ७४ पैकी ०.६४३० हेक्टर आर.चौरस मीटर, गट क्रमांक ७२ पैकी १.९४९० हेक्टर आर. चौरस मीटर क्षेत्राचे खरेदी खत करण्यात आले. या गटाचे खातेदार रघुनाथ नाळे, नंदिनी बाळासो गाढवे व इतरांना नुकसान भरपाईचा मोबादला एकूण ३ कोटी ३४ लाख ३३ हजार ५ रुपयाचा धनादेश उपविभागीय अधिकारी बारामती यांच्या हस्ते व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर तर्फे डॉ. विकास वासकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



