ताज्या बातम्याराजकारण

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा; अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावर कब्जा

सातारा (बारामती झटका)

जिल्हा परिषद सत्तेसाठी झालेल्या चुरशीच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने अचूक मास्टर प्लॅन राबवत अखेर सत्ता आपल्या ताब्यात घेतली. मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रणनीतीची जोरदार चर्चा होत असून, त्यांची खेळी यशस्वी ठरली.

नेमक्या राजकीय डावपेचांद्वारे भाजपने संख्याबळाची जुळवाजुळव करत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही पदांवर विजय मिळवला. अध्यक्षपदी प्रिया शिंदे यांची निवड झाली असून, उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड करण्यात आली.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र येत प्रयत्न केले, मात्र भाजपच्या नियोजनबद्ध हालचालींसमोर त्यांची गणिते फोल ठरली.
या विजयामुळे सातारा जिल्ह्यात भाजपचा प्रभाव अधिक मजबूत झाला असून, आगामी राजकारणातही या निकालाचे दूरगामी परिणाम दिसणार आहेत. निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button