मुंगी घाटातून उद्या मानाच्या कावडी महादेवाला जाणार

शिखर शिंगणापूर चैत्री यात्रेचा उत्साह शिगेला, कडक पोलीस बंदोबस्त तैनात
नातेपुते (बारामती झटका)
छत्रपती शिवाजीराजे यांचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूरचा शंभु महादेव यांची चैत्र यात्रा पाडव्याला सुरू झाली आहे. पंचमीला हळदी, अष्टमीला लग्न समारंभ उत्साहात साजरा झाला आहे. रविवारी ता. २९ ला एकादशी व्रत असून द्वादशी सोमवारी ता. ३० रोजी आहे. हा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी शंभू महादेवाला जलाभिषेक केला जातो.
सासवड व पंचक्रोशीतील अनेक मानाच्या कावडी या सोलापूर जिल्ह्यातील कोथळे गावातील मुंगी घाटातून शिखर शिंगणापूरला येत असतात. हा भक्तीचा व शक्तीचा सोहळा पाहण्यासाठी मुंगी घाटात सकाळपासून सायंकाळ पर्यंत हजारो भाविक येतात. सासवड येथील तेल्या भुत्याची मानाची कावड ही कोणत्याही प्रकारची मदत न घेता फक्त मानवी साखळी तयार करून वरती नेली जाते, हे या यात्रेचे विशेष आकर्षण मानले जाते.
शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त मुंगी घाट परिसरातील बंदोबस्ताची जबाबदारी सोलापूर जिल्हा पोलिसांकडे आहे. शुक्रवारी ता.२७ रोजी अकलूज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी शिखर शिंगणापूर यात्रा अनुषंगाने मुंगी घाट येथे भेट दिली व सर्व बंदोबस्त व कावड यात्रा अनुषंगाने माहिती घेतली. तसेच भाविकांना यात्रा कालावधीत अडचणी येऊ नयेत याकरिता माहिती घेतली व सूचना दिल्या. अनुषंगाने पुरविण्यात आलेला बंदोबस्ताचा आढावा घेतला.

पुरविण्यात आलेला बंदोबस्त…
पोलीस अधिकारी ६,
पोलीस अंमलदार ८२,
होमगार्ड ३०,
पोलीस मुख्यालयाकडील आरसीपी पथक एक असा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यावेळी सपोनि विशाल वायकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



