तार चोरताना टॉवर कोसळला; पुण्याच्या दोघांचा नांदूरघाट शिवारात मृत्यू,

केज (बारामती झटका)
केज तालुक्यातील नांदुरघाट शिवारात विद्युत टॉवरची तार चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्याच्या दोन संशयित तरुणांचा टॉवर अंगावर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. २९ मार्च रोजी मध्यरात्री ही घटना घडली असून अविनाश पटोळे आणि आकाश आडे अशी मृतांची नावे आहेत.
टॉवरवर चढून तार काढत असताना संतुलन बिघडल्याने लोखंडी टॉवर कोसळला आणि त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या साथीदारांनी हा रस्ते अपघात असल्याचे भासवून मृतदेह इर्टिगा कारमधून परभणीला नेले. मात्र परभणीत पोहोचताच साथीदार पसार झाले आणि कार चालकाने मृतदेह रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
मृतांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी कार चालक सूरज गिराम याला ताब्यात घेतले आहे. बीडच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुराव्यांचे नमुने गोळा केले असून केज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



