ह. भ. प. अमोल महाराज सुळ, मोरोची यांचे ६० फाटा, पाटील वस्ती, माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. संताजी वाघमोडे यांच्या पुण्यस्मरण निमित्त रक्तदान शिबिर, किर्तन, पुष्पवृष्टी आरती व महाप्रसादाचे आयोजन
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे माळशिरस शहराध्यक्ष कै. संताजी गंगाराम वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन शुक्रवार दि. १०/०४/२०२६ रोजी ६० फाटा, पाटील वस्ती, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी पुण्यस्मरण निमित्त ह. भ. प. अमोल महाराज सुळ, मोरोची यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. तसेच समस्त मित्रपरिवार आणि ग्रामस्थ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीचे माळशिरस शहर अध्यक्ष कै. संतोष गंगाराम वाघमोडे यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन, अहोरात्र गोरगरीब जनतेची सेवा, अडल्या नडले यांना मदत करणे, सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांशी मिळून मिसळून राहून, कोणालाही त्रास न देता थोड्याच दिवसांत त्यांनी जनतेच्या मनावर आपले नाव कोरले, अशा या महान कार्यकर्त्याच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ६० फाटा, पाटील वस्ती येथे करण्यात आलेले आहे.
तरी माळशिरस पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त वाघमोडे परिवार यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून कीर्तनास आणि रक्तदान शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



