ताज्या बातम्यासामाजिक

जय मल्हार साखर कारखान्याचे चेअरमन श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांची नात दिव्याराजे हिचा वाढदिवस थाटात संपन्न…

माळशिरस (बारामती झटका)

जय मल्हार साखर कारखाना लिमिटेड चांदापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर, कारखान्याचे चेअरमन श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांची नात कुमारी दिव्याराजे प्रितमसिंह देवकाते पाटील हिचा दि. 15/04/2026 रोजी 13 वा वाढदिवस माळशिरस येथील हिमालय निवासस्थानी मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न झाला.

माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवाजीराव पाटील उर्फ शिवाजी भाऊ यांची ज्येष्ठ सुकन्या साधनादेवी यांचा काशिनाथ देवकाते पाटील यांच्याशी विवाह झालेला आहे. सौ. साधनादेवी व श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांना प्रितमसिंह, हिमालय, शंभुराजे अशी तीन रत्ने आहेत. त्यापैकी जय मल्हार साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह संचालक प्रितमसिंह यांचा लातूर येथील राजे हाके घराण्यातील श्वेतादेवी यांच्याशी विवाह झालेला आहे. सौ. श्वेतादेवी व प्रितमसिंह यांना कुमारी दिव्याराजे व चिरंजीव शिवेंद्रराजे अशी दोन गोंडस अपत्ये आहेत. चिरंजीव शिवेंद्रराजे याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आलेला होता. दिव्याराजे हिचा वाढदिवस उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आलेला आहे.

आजोबा श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांनी वाढदिवसाच्या केक कापून आपल्या नातीला गोड शुभेच्छा दिलेल्या आहेत. दिव्याराजे हिने आपल्या वाढदिवसाला बंधू शिवेंद्रराजे याला केक भरविलेला आहे. बहीणभावाचे अतूट नाते अधिक दृढ करण्याचा हा प्रसंग होता. देवकाते पाटील परिवारातील उपस्थित सदस्यांना बहिण भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी व जिव्हाळा पहावयास मिळालेला आहे.

दिव्याराजे हिला वाढदिवसानिमित्त चुलते मुंबई आयकर आयुक्त हिमालय देवकाते पाटील व युवा उद्योजक शंभुराजे देवकाते पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत‌. दिव्याराजे हिचा देवकाते पाटील परिवारांच्या वतीने उत्साहात, थाटामाटात व आनंदात वाढदिवस संपन्न झालेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button