छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान समाधान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

लवंग (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान समाधान शिबिर शुक्रवार दि. १७/०४/२०२६ रोजी लवंग मंडळामधील सुभद्रा मंगल कार्यालयामध्ये श्रीमती विजया पांगारकर उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या शिबिरासाठी दत्तात्रय मगर पंचायत समिती सभापती, माऊली लोंढे जिल्हा परिषद सदस्य, ऋतुजाताई पराडे पाटील पंचायत समिती सदस्या, प्रशांत पाटील सरपंच ग्रामपंचायत लवंग आदी उपस्थित होते.
तसेच लवंग मंडळातील विजयकुमार जाधव मंडळ अधिकारी लवंग, अनिल घेरडे, श्रीमती सुषमा निकम, सुदर्शन क्षीरसागर, सोमनाथ गोडसे, योगेश कदम ग्राम महसूल अधिकारी, बाळासाहेब सरवदे, शहाजी हंकारे, सोमनाथ कस्तुरे, सौ. वृषाली सरवदे महसूल सेवक, तसेच लवंग मंडळातील सर्व गावातील प्रतिष्ठित शेतकरी वर्ग, शेतमजूर, विद्यार्थी व ग्रामस्थ या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले, सातबारा उतारे, शिधापत्रिका सर्व मिळून नाव कमी करणे ४७, शिधापत्रिका नाव समाविष्ट २८, नवीन शिधापत्रिका ४६, रहिवासी ११, उत्पन्न १४५, जमीन नसलेले ९, जाती दाखले २९, नॉन क्रिमीलेअर २१, प्रतिज्ञापत्रे ५७, डोमासाईल ४२, एसटी महामंडळ कार्ड ९९, आरोग्य विभाग औषध उपचार तपासणी ७४, सातबारा/ ८अ ७४, वारस नोंदी ३, तुकडेबंदी नोंद १, भगवटदार वर्ग २ ते ९ रूपांतरण २, ९५५ ची प्रकरणे दाखल ११, मंडळ अधिकारी चौकशी अहवाल ८ असे देण्यात आले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



