ताज्या बातम्याशैक्षणिक
खंडाळीच्या सन्मती प्राथमिक विद्यालयाचा शिवतेज खंडागळे मंथन परीक्षेत श्रीपुर केंद्रात प्रथम

खंडाळी (बारामती झटका)
ज्ञानगंगा बालविकास मंडळ खंडाळी संचलित, सन्मती प्राथमिक विद्यालय खंडाळी, ता. माळशिरस येथील शिवतेज विकास खंडागळे इयत्ता – ३ री याने २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन परीक्षेत श्रीपुर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यास विद्यालयाच्या शिक्षिका स्मिता वाघे यांचे मार्गदर्शन मिळाले.
शिवतेज खंडागळे याचे या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष सुभाष गांधी, उपाध्यक्ष धर्मराज शिंदे, सचिव श्रीमंत कानगुडे, मुख्याध्यापिका वर्षा पातळे, श्रीमती पार्वतीबाई ननवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक चांगदेव लोंढे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



