माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री. ज्ञानेश्वर मिसाळ

वाघोली (बारामती झटका)
माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित माळशिरसचे चेअरमन श्री. अमोल नष्टे यांनी राजीनामा दिल्यामुळे चेअरमन पद रिक्त होते. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूज यांचे आदेशानुसार दि. 5 मे रोजी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कवडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली संस्थेच्या संचालक मंडळाची चेअरमन निवडीची सभा संपन्न झाली. चेअरमन पदासाठी संस्थेचे संचालक श्री. ज्ञानेश्वर सुभाष मिसाळ यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कवडे साहेब यांनी ज्ञानेश्वर मिसाळ यांची संस्थेचे चेअरमन पदी निवड जाहीर केली. निवड प्रक्रियेनंतर मावळते चेअरमन श्री. अमोल नष्टे यांनी नवनिर्वाचित चेअरमन ज्ञानेश्वर मिसाळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था ही 1928 साली स्थापन झाली असून संस्थेचे भाग भांडवल 74 लाख रुपये असून 860 सभासद आहेत. सदर निवड सभेस संस्थेचे माजी चेअरमन अमोल नष्टे, अण्णा मगर, विजय शिंदे, अशोक पवार, ज्ञानेश्वर मिसाळ, शामुदी मुल्ला, राजेंद्र गोरवे, श्रीमती मोहिते, तुकाराम सर्वगोड आदी संचालक उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेनंतर संस्थेचे मार्गदर्शक दिलीप ताटे, मधुकर यादव, अशोक रुपनवर, राजेंद्र जाधव, राजेंद्र मिसाळ, शहाजी काशीद यांनी नवनिर्वाचित चेअरमन यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सदर सन्मानावेळी सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष दिलीपराव पाटील सर, शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोहर एकतपुरे, जय विजय शिक्षक संघाचे अध्यक्ष सुभाष मिसाळ सर, दिव्यांग शिक्षक संघटनेचे विजयकुमार देशमुख सर, मोहन बाबर सर, उमाजी माने सर, जगदीश मिसाळ सर, दिगंबर मिसाळ सर, श्रीकांत मिसाळ सर, प्रदीप मिसाळ, सादिक बागवान, नवनाथ मिसाळ, संस्थेचे सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव सतीश दिवटे यांनी सहकार्य केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



