ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर श्री‌. विनोद रणदिवे उर्फ बलीशेठ यांची नियुक्ती….

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेने व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शिफारशीने जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर निवड…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेने व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या शिफारशीने एस. कार्तीकेयन जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती तथा जिल्हाधिकारी सोलापूर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 सुधारित नियम 1995 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे आदेश काढलेले असून अशासकीय सदस्य म्हणून नातेपुते नगरीचे आंबेडकरी चळवळीचे युवा नेते श्री. विनोद बाळासो रणदिवे उर्फ बलीशेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे..

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशामध्ये श्री. जितेंद्र शंकर बनसोडे सिद्धार्थ नगर पंढरपूर, श्री. अरुण तोरप्पा क्षीरसागर सम्राट चौक सोलापूर, श्री. मोहन बाळासाहेब गायकवाड कुर्डू माढा, ॲड. विजय तानाजी बनसोडे भीमनगर सांगोला तसेच दोन बिगर मागासवर्गीय सदस्यांमध्ये श्री. सुदर्शन मसु यादव मंगळवेढा, ॲड. श्री. मल्लिनाथ हनुमंत आप्पा राचेटी सोलापूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात नातेपुते नगरीचे आंबेडकरी चळवळीचे युवा नेते श्री. विनोद रणदिवे उर्फ बलीशेठ यांनी कार्यातून समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचे अनेक विश्वासू सहकारींपैकी एक विश्वासू सहकारी असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे शिफारस केलेली होती. सदरच्या शिफारशीवरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या सूचनेप्रमाणे यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर नियुक्ती झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button