देवभूमि जतच्या ग्रामीण रस्ते विकासासाठी 75 कोटी देणार – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे

जतला पंचायत समिती इमारतीचे भूमिपूजन संपन्न
जतला ‘देवभूमी जत’ असा दर्जा द्या – आ. गोपीचंद पडळकर
देवभूमी जत (बारामती झटका)
आ. गोपीशेठनी मागायचं आणि मी द्यायचं असा एक आमचा अलिखित नियमच आहे, त्यांनी पंचायत समितीच्या इमारतीची मागणी केली, पंधरा कोटीच्या इमारतीचे आज भूमिपूजन झाले. आता जत मधील ग्रामीण रस्ते विकासासाठी चालू वर्षात 75 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केली. शिवाय ‘देवभूमी’ जत ही मागणी देखील पूर्ण करू असा शब्द त्यांनी दिला.
जत, जि. सांगली येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. सदाभाऊ खोत होते.
या भूमिपूजन समारंभास माजी मंत्री श्री. सदाभाऊ खोत, आमदार श्री. गोपीचंद पडळकर, जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, जत पंचायत समितीच्या सभापती सौ. अर्चना नाथा पाटील, उपसभापती श्री. रवींद्रकुमार बगली, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊलीभाऊ हळनवर, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, चंद्रशेखर गोब्बी, विजय रुपनूर, भाऊ दुधाळ, आकाराम मासाळ, विक्रम ताड, परशुराम मोरे, अतुल मोरे, अण्णासाहेब गडदे, रमेश बिराजदार, आप्पासाहेब नामद, मनोज जाधव, शशिकांत शिंदे, अशोक बन्नेनवर, स्वाती शिंदे, रमेश देवर्षी, दिग्विजय चव्हाण, मिलिंद पाटील, सोमनींग बोरामणी, अण्णा बिसे, अभिजित चव्हाण, गौतम ऐवले, मिथुन भिसे, यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, जत तालुक्याला गेल्या 65 वर्षात पंचायत समितीला इमारत नव्हती. परंतु आ. गोपिशेठ यांनी आमदार होताच ती पूर्ण करून घेतली. हा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते काम करत आहेत. शिवाय त्यांच्या मागे देवाभाऊ आणि जयाभाऊ यांची ताकद उभी आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. गोपिशेठ यांनी जत तालुक्याला दिलेली सारी आश्वासने या पाच वर्षात पूर्ण होतील असा विश्वास ना. गोरे यांनी व्यक्त केला.
जत तालुक्याचा विकासाचा बकलॉग मोठा आहे, तो भरून काढण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. सुदैवाने देवाभाऊ यांनी माझ्याकडे ग्रामविकास हे खाते दिले आहे. माणूस जन्मास आल्यापासून तो जाण्यापर्यंत जे जे हवे ते माझ्या खात्यात मिळते. त्यामुळे आ. गोपिशेठ ज्या मागण्या करतील ते मी लगेच देऊन टाकतो. विशेष म्हणजे आज राज्यातील आमदारामध्ये गोपिशेठ यांच्यासाठी आमचा निकषच वेगळा आहे. मागे आम्ही प्रत्येक तालुक्याला पाच ग्रामपंचायत इमारत देणार होतो. पण गोपीशेठ यांनी 22 मंजूर करून घेतल्या. तीर्थक्षेत्र पर्यटन विकासामधून तालुक्यातील नऊ धार्मिक स्थळांना त्यांनी प्रत्येकी पाच कोटीचा निधी मंजूर करून घेतला, अशी कितीतरी कामे सांगता येतील ज्यासाठी आ. गोपीशेठ यांचा सततचा पाठपुरावा सुरू असतो. कारण या माणसाने या मातीसाठी आपले जीवनच अर्पित करण्याचा संकल्प केला आहे, असेही ना. गोरे म्हणाले.
रस्ते विकासासाठी 75 कोटी
आ. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात जतच्या ग्रामीण रस्त्यांची अवस्था ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर मांडली. तालुक्यात ग्रामीणचे 890 किलोमीटर लांबीचे रस्ते असून याचा विकास व्हावा ही मागणी करताच ना. जयकुमार गोरे यांनी चालू आर्थिक वर्षात जतसाठी 75 कोटींचे रस्ते देण्याची घोषणा केली. तसेच आता पंचायत समितीची होणारी इमारत देखील जिल्ह्यात सर्वात टॉप असेल, यासाठी आणखीन निधी लागल्यास देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
61 वर्षानंतर स्वप्न पूर्ण होतंय : आ. पडळकर
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, जत तालुक्यासाठी आजचा दिवस अतिशय भाग्याचा आहे. तब्बल 61 वर्षानंतर जतच्या पंचायत समितीसाठी नवी इमारत साकारत आहे, यासाठी ना. देवाभाऊ आणि ना. जयाभाऊ यांनी विशेष करून 15 कोटींचा निधी तातडीने मंजूर करून दिला. जिल्ह्यातील सर्वात सुंदर आणि प्रशासकीय दृष्ट्या सोयीची ही इमारत असणार आहे. आज देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास झपाट्याने होतो आहे. जत तालुका विकासात नंबर एकवर आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. गेल्या दोन वर्षात म्हैसाळ विस्तार योजनेला गती दिली. डिसेंबर पर्यंत संघाच्या तालावर पाणी नेहमीच नेण्याचे नियोजन पूर्ण होत आहे. जर शेरासाठी 79 कोटींची नवी पाणी योजना 70 टक्के पूर्ण करण्यात आली. पुढच्या दोन एक महिन्यात पालिकेच्या इमारतीचे देखील भूमिपूजन होणार आहे. जिल्ह्यातील सर्वात सुंदर क्रीडा नगरी करण्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. प्राणी संग्रहालयासाठी दोन दिवसात मंत्रालयात बैठक होत असून हे काम देखील आपण पूर्ण करून घेत आहोत.
आज जयाभाऊंमुळे तालुक्यात दहा हजार घरकुलांचे स्वप्न साकार होत आहेत. कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी तालुकास्तरीय आमदारांच्याच कार्यालयात आता कामे पूर्ण करून दिली जाणार असल्याने यातील दलाली बंद होऊन त्यांना चांगली मदत मिळणार आहे. येणाऱ्या काळात जतच्या विकासासाठी आपण जे जे शब्द दिलेत ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही आमदार पडळकर म्हणाले.

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, गेल्या शंभर वर्षात जतचा जितका विकास झाला नाही तितका विकास अवघ्या दोन वर्षात गोपीशेठनी करून दाखवला आहे. बहुजन समाज आणि दुष्काळी भागासाठी प्रस्थापितांच्या विरोधात संघर्षाने लढणारे हे नेतृत्व आहे. या नेतृत्वाला तालुक्याने जपण्याची गरज असून, आधुनिक काळातील ते मल्हारराव होळकर आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
यावेळी डॉ. रवींद्र आरली यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी प्रास्ताविक गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांनी केले. तर आभार पंचायत समिती सदस्य विजय रुपनर यांनी मांडले. सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले.
देवभूमी जतने भाषणाची सुरुवात
दुष्काळी जत या शिक्क्यापासून देवभूमी जत ही नवी ओळख निर्माण करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आमदार गोपीचंद पडळकर यांनी हाती घेतला आहे. नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे त्यांनी देवभूमी जत हा दर्जा लवकर मिळावा अशी मागणी केली. यावर मंत्री गोरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच ‘देवभूमी जत’ अशी करतच आमदार पडळकर यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



