स्थानिक गुन्हे शाखा व टेंभुर्णी पोलीस ठाणेची दमदार कामगिरी, व्यापाऱ्याचे दोन कोटी सत्तर लाख रूपये हस्तगत चार आरोपी अटक.

टेंभुर्णी (बारामती झटका)
चडचण, जि. विजयपुर राज्य कर्नाटक येथील साडी दुकानदार बाहुबली एन. मुत्तीन यांचे मॅनेजर यातील फिर्यादी धुंडाप्पा रामान्ना खलाटे वय 35, व्यवसाय सेल्समन, रा. गोटयाळ, ता. चडचण, जि. विजयपुर, राज्य कर्नाटक हे त्यांचे मालक यांनी त्यांना सुरत येथे पाठविणे करीता रोख रक्कम तीन कोटी रूपये दोन पोत्या मध्ये दिले होते. यातील फिर्यादी हे ती रोख रक्कम घेवुन आयषर टेंम्पो क्रमांक एम.एच.45/ए.एफ.1516 ही मधुन टेम्पो मालक नागनाथ सुर्वे, सुनिल सुर्वे यांचे सोबत कॅबिनचे टपावर पैशांची दोन पोती ताडपत्रीमध्ये बांधुन टेंभुर्णी ते करमाळा रोडने दि. 11/05/2026 रोजी रात्री 02.15 ते 02.20 वा. दरम्यान टेंभुर्णीचे पुढील करमाळा रेाडवरील बंद पडलेल्या टोलनाक्याचे पुढील बाजुस असलेल्या वळणावरून जात असताना टेंम्पोस रोडवर गजग्या रंगाचे बिगर नंबरचे स्विप्ट कार आडवी लावुन फिर्यादीचा टेम्पो थांबवून कारमधुन चार जण उतरून टेम्पोचे कॅबिनमध्ये येवुन फिर्यादीस व त्यांचे सोबतचे लोकांना चाकुचा धाक दाखवुन हाताने मारहाण करून फिर्यादीचे नरडे दाबुन कॅबिनवर चढुन कॅबिनवरील बाजुस असलेल्या ताडपत्रीमध्ये ठेवलेली दोन पोत्यामधील रोख रक्कम 3,00,00,000/- रूपये (तीन कोटी रूपये) चे बंडल फिर्यादीस जबरदस्ती करून पैशाची पोती खालील बाजुस जमीनीवर टाकुन ते त्यांचे स्विप्ट कारमध्ये भरून फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे मारण्याची धमकी देवुन चाकुचा धाक दाखवुन कारमधुन निघुन गेले होते. त्याबाबत मॅनेजर धुंडाप्पा रामान्ना खलाटे यांनी फिर्याद दिल्याने टेंभुर्णी पेालीस ठाणे गु.र.नंबर 346/2026 भारतीय न्याय संहीता सन 2023 चे कलम 309(6),126(2),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यांचा तपास मा. राहुल आत्राम, परी. सहा. पोलीस अधिक्षक तथा प्रभारी अधिकारी टेंभुर्णी पोलीस ठाणे यांचेकडे देण्यात आला होता.
सदर दाखल गुन्ह्यात मोठी रक्कम मारहाण करून चोरी गेली असल्याने मा. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांनी या गंभीर गुन्ह्यात दखल घेवुन स्थानिक गुन्हे शाखेकडील संजय जगताप यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्थानिक गुन्हे शाखेची दोन तपास पथक तयार करण्यात आली होती. त्याप्रमाणे गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध चालु असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकातील टिमला तांत्रिक विश्लेषण व गोपनिय माहीतीव्दारे संषयीत आरोपी नामे अजित नामदेव सुर्वे वय 26 वर्ष रा. पांढरे वस्ती, अरण रोड, मोडनिंब याने गुन्हा केल्याची माहीती मिळाल्याने त्यास ताब्यात घेतले. नंतर त्यांनी सदरचा गुन्हा हा 1) सिद्धेश्वर नामदेव माने, वय 34 वर्षे, रा. पालखीमार्ग, मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर. 2) अजित नामदेव सुर्वे वय 26 वर्षे, रा. पांढरेवस्ती, पालखी मार्ग, अरण रोड, मोडनिंब, ता. माढा 3) शुभम शहाजी पाटील वय 23 वर्षे, रा. रानमळा, मोडनिंब, ता. माढा 4) विकी राजाभाऊ गिड्डे रा. गणपती मंदीराचे जवळ दत्तनगर, मोडनिंब, ता. माढा (अटक नाही) यांनी मिळुन केला असुन त्यामध्ये विकी गिड्डे यांचे कडील गजग्या रंगाची कार वापरल्याचे सांगितले. त्यावरून तपास पथकांतील ज्ञानदेव वाघ, सहा. पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीव्दारे व तांत्रिक विश्लेषणाव्दारे यातील आरोपी सिद्धेश्वर नामदेव माने हा सुरत, राज्य गुजरात येथे असल्याचे माहीती मिळाल्याने त्यास सुरत गुजरात येथुन ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे यातील आरोपी शुभम शहाजी पाटील हा चैनई येथे गेला होता. तो मोडनिंब येथे आला असल्याने तपास पथकांतील ज्ञानदेव वाघ, सहा. पोलीस निरीक्षक, यातील शुभम शहाजी पाटील रा. मोडनिंब, ता. माढा हा गोलाई, मोडनिंब, ता. माढा येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.
यातील मिळुन आलेले 1) सिद्धेश्वर नामदेव माने, वय 34 वर्षे, रा. पालखीमार्ग, मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर. 2) अजित नामदेव सुर्वे वय 26 वर्षे, रा. पांढरेवस्ती, पालखी मार्ग, अरण रोड, मोडनिंब, ता. माढा 3) शुभम शहाजी पाटील वय 23 वर्षे, रा. रानमळा यांना गुन्ह्याचे कामी मा. राहुल आत्राम, परी. सहा. पोलीस अधिक्षक तथा प्रभारी अधिकारी टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी अटक करून त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली होती.
यातील आरेापी कडे पोलीस कस्टडीमध्ये तपास करीत असताना आरोपी नामे सिद्धेश्वर नामदेव माने, मोडनिंब याने त्यांचे दाजी यातील आरोपी नामे सुरज देविदास उन्हाळे वय 33 वर्षे, रा.उन्हाळे आगलावे वस्ती, जगदंबा नगर, पोखरापुर, ता. मोहोळ यांनी गुन्ह्यातील चोरी केलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम दिली असल्याने व त्यांचे दाजी यांनी सोने खरेदी केले होते. त्यावरून चोरीचा माल घेतला म्हणुन अटक करून पोलीस कस्टडी घेण्यात आली होती.
यातील सर्व आरोपीकडे मा. राहुल आत्राम, परी. सहा. पोलीस अधिक्षक तथा प्रभारी अधिकारी टेंभुर्णी, ज्ञानदेव वाघ, विजय गोसावी, सहा. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व सह तपास अधिकारी अजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक यांनी केला असता यातील आरोपींनी गुन्ह्यांची कबुली देवुन त्यांनी गुन्ह्यातील फिर्यादीचा मौजे मोडनिंब येथुन कारमधुन पाठलाग करून कार आडवी लावुन चाकुचा धाक दाखवुन व मारहाण करून पैसाचे दोन पोती टेंम्पोचे टपावर चेारून नेले असलेबाबत सांगितले. यातील आरोपीकडे पेालीस कस्टडी दरम्यान आरोपीने चोरीस गेलेल्या रक्कमेतुन खरेदी केलेले सोने, तीन ॲप्पल कंपनीचे मोबाईल खरेदी केले होते. तीन मोबाईल किंमत 2,61,990 रूपये, सोने किंमत 5,49,440 रूपये व तीन अटक आरोपी कडुन 2,62,00,000/रूपये अशी सर्व मिळुन एकुण 2,70,11,430/- रूपयेचा रोक रक्कम, सोने, मोबाईल असा मुदेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास हा मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, अंजना कृष्णा, सहा. पोलीस अधिक्षक, करमाळा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुल आत्राम, परी. सहा. पोलीस अधिक्षक हे तपास करीत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपीची दि. 28/5/2026 रेाजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही राहुल आत्राम, परी. सहा. पोलीस अधिक्षक, संजय जगताप, स्थनिक गुन्हे शाखा, ज्ञानेदव वाघ, सहा. पोलीस निरीक्षक, विजय गोसावी, सहा. पोलीस निरीक्षक, अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक, खाजाभाई मुजावर, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, नारायण गोलेकर, प्रकाश काटकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार मोहन मनसावले, अन्वर आतार, प्रमोद शिंगाडे, धनराज गायकवाड, योगेष जाधव, धनाजी गाडे, सतीष बुरकुल व टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील अजित मोरे, विलास रणदिवे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार प्रदीप पर्वते, पो. काॅ. समीर खैरे, प्रसाद अनभुले, समाधान धोत्रे, मोहन तळेकर, नितीन डाकवाले व दत्तात्रय पवार इत्यादी पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



