बार्शीचे मा. आ. राजेंद्र राऊत यांची दावेदारी प्रबळ, जिल्ह्यातील आमदारांकडूनच बळ

बार्शी (बारामती झटका)
भाजप नेते तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानपरिषद उमेदवारीसाठी 4 अर्ज घेतले असून विधानपरिषदेसाठी भाजपकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या चर्चेला आता लवकरच पूर्णविराम मिळणार असून राजेंद्र राऊत यांची उमेदवारी प्रबळ असल्याचं चित्र जिल्ह्यात आहे. भाजपमध्ये त्यांचं योगदान, जिल्हा बँकेचा पाठपुरावा, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांतील यश आणि जिल्ह्यात आगामी पक्षबांधणीचं काम लक्षात घेता राऊत यांनी प्रशांत परिचारक यांना मागे टाकल्याची चर्चा होत आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत यांच्याच नावाची चर्चा जोर धरत होती. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरें सोबतची जवळीक, निवडणुकांतील रिझल्ट, जिल्ह्यातील इतर आमदारांचा पाठिंबा आणि सर्वोतोपरी असलेली तयारी लक्षात घेऊन त्यांची उमेदवार निश्चित असल्याचे समजते. आता, लवकरच भाजपकडून नावाची घोषणा होऊ शकते.
दरम्यान, महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाकडून रमेश बारसकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुती एकत्र लढणार का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



