ताज्या बातम्यासामाजिक

नातेपुते येथील सौ. लक्ष्मी नारायण पांढरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे यांना मातृषोक..

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते, ता. माळशिरस येथील सौ. लक्ष्मी नारायण पांढरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवार दि. 31/05/2026 रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, चार मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर आजच सायंकाळी 06 वाजता नातेपुते दहिगाव रोड 44 फाटा पांढरे वस्ती येथील राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिकूल परिस्थितीत सौ. लक्ष्मी पांढरे यांनी संसार उभा केलेला आहे. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी आपला देह पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी ठेवलेला आहे. त्यांना सौभाग्य मरण आलेले आहे. जन्म म्हटलं की मृत्यू अटळ असतो. मृत्यू सुद्धा चांगल्या दिवशी आलेला आहे. आईसाहेब यांच्या जन्माचे सार्थक झालेले आहे.

आईसाहेब यांच्या दुःखद निधनाने पांढरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि सौ. लक्ष्मी उर्फ आईसाहेब यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button