३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सिताराम ढाणे सेवानिवृत्त…

खंडाळी (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर विभाग कामगार कल्याण समितीच्या वतीने सिताराम भानुदास ढाणे मु. पो. खंडाळी, ता माळशिरस यांचा ३८ वर्षे ३ महिने प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर, अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने – पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी एसटी महामंडळातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी महामंडळामध्ये त्यांच्या सेवेची सुरुवात अकलूज येथे झाली व निवृत्तीदेखील अकलूज येथे झाली. आदर्श, मनमिळावू, शांत व कष्टाळू कर्मचारी म्हणून त्यांची अकलूज वर्कशॉप आगारामध्ये ओळख होती. तसेच खंडाळी येथे त्यांचा ढाणे परिवार व खंडाळी, दत्तनगर ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास गोपाळ केचे, विकास चव्हाण, दिलीप ढाणे, सचिन जाधव, शिवाजी ढाणे, संजय महाडिक, नागेश ढाणे, सौरभ भोसले, निखिल ढाणे, राहूल ढाणे, हनुमंत ढाणे, महावीर ढाणे उपस्थित होते.
– शरद भोसले (सर )खंडाळी
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



