ताज्या बातम्यासामाजिक

चि. यश कुलकर्णी, माळशिरस आणि चि. सौ. कां. गंधाली खरे, पंढरपूर यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार….

निमंत्रक
श्री गणेश कुमार कुलकर्णी
मु. पो. ता. माळशिरस, जि‌. सोलापूर..

माळशिरस (बारामती झटका)

स्वर्गीय रामकृष्ण दामोदर कुलकर्णी यांचे नातू श्रीमती प्रभा व स्वर्गीय जगदीश रामचंद्र कुलकर्णी रा. माळशिरस यांचे सुपुत्र चि. यश आणि स्वर्गीय यशवंत प्रभाकर खरे यांची नात व स्वर्गीय सुप्रिया व श्री. मनोहर यशवंत खरे रा. पंढरपूर यांची कनिष्ठ कन्या चि. सौ. कां. गंधाली यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दि. 27/06/2026 रोजी दुपारी 12 वाजून 38 मिनिटे शुभमुहूर्तावर दाते मंगल कार्यालय, सांगोला रोड, पंढरपूर येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे निमंत्रक श्री. गणेश कुमार कुलकर्णी व समस्त कुलकर्णी परिवार यांच्या वतीने शुभ कार्यास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे…

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनई चौघड्यांच्या मंजूर स्वरात नव जीवनात केलेले पदार्पण, सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन, सासर माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण, यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्छांची सुखद रम्य पाखरण, म्हणूनच या शुभविवाहाचे आपणांस आग्रहाचे निमंत्रण आहे. सदरचा शुभविवाह सोहळा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. श्री. आप्पासाहेब एकनाथ देशमुख, श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर व्हाईस चेअरमन ॲड. श्री. मिलिंद विष्णुपंत कुलकर्णी, हरिभक्त परायण श्री. कैवल्य महाराज चातुर्मासे श्रीक्षेत्र पंढरपूर, ह. भ. प. श्री. श्रीकांत महाराज मदन हरिदास श्रीक्षेत्र पंढरपूर, माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता रणजीत ओहोळ, पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. अशोक बळीराम शिंदे, ॲड. श्री. सत्यजित केशव गलांडे व उद्योजक श्री. बबन बारीकराव देवकाते पाटील, माळशिरस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी आपण सहकुटुंब यावे असे आपले नम्र श्रीमती रेखा जयवंत कुलकर्णी, श्रीमती प्रभा जगदीश कुलकर्णी, सौ. प्रतिभा व श्री. कुमार रामकृष्ण कुलकर्णी आणि समस्त कुलकर्णी परिवार यांच्या वतीने शुभकार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाई गडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून शुभविवाह सोहळ्यास येण्याचे अगत्य करावे, असे निमंत्रक श्री. गणेश कुमार कुलकर्णी यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button