चि. विश्वजीत पाटील, माळशिरस आणि चि. सौ. कां. आरती देवकाते पाटील, मलठण यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक
श्री. ॲड. सुभाष अण्णा बाळासाहेब पाटील
भाजपा ज्येष्ठ नेते
मा. अध्यक्ष शेळी मेंढी महापालन महामंडळ महाराष्ट्र राज्य
माळशिरस (बारामती झटका)
कै. हनुमंतराव शंकरराव पाटील यांचे नातू व सौ. गीतांजली व श्री. सूर्यकांत काकासाहेब हनुमंतराव पाटील रा. माळशिरस, ता. माळशिरस या़चे सुपुत्र चिरंजीव विश्वजीत आणि कै. बाजीराव दाजीबा देवकाते पाटील यांची नात व सौ. संगीता व श्री शिवाजी बाजीराव देवकाते पाटील राहणार मलठण यांचा शाही शुभ विवाह सोहळा शनिवार दि. 11/07/2026 रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटे या शुभ मुहूर्तावर मधुर मिलन मंगल कार्यालय, नातेपुते-माळशिरस रोड, नातेपुते, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री जीवनाची, मुहूर्त क्षणाचा पण नाती आयुष्याची, आपल्या उपस्थितीसह आशीर्वाद कायमचा, वधूवरांस शुभाशीर्वाद व सुमन अक्षतांचा वर्षाव करण्याकरता सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक श्री. ॲड. सुभाष अण्णा बाळासाहेब पाटील भाजपा ज्येष्ठ नेते मा. अध्यक्ष शेळी मेंढी महापालन महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



