ताज्या बातम्यासामाजिक

डीसीसी बँक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करा – विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर

सोलापूर (बारामती झटका) (लोकमत साभार)

अखेर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता असून, प्रशासनाच्या वतीने बँकेच्या प्रशासक कालावधीतील प्रगतीचे शपथपत्र उच्च न्यायालयाला देण्यात आले आहे. दरम्यान, १ जुलै २०२६ हा अर्हता दिनांक गृहीत धरून मतदार याद्या तयार कराव्यात. तसेच निवडणूक खर्चासाठी १० लाख रुपये प्राधिकरणाला जमा करण्यात यावेत, असे विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर व त्या संदर्भाने निवडणूक प्राधिकरणाचे पत्र डीसीसीच्या शपथपत्रासोबत जोडले आहे.

बँकेच्या प्रगतीचे ‘शपथपत्र’
डीसीसी बँकेने दिलेल्या शपथपत्रात प्रशासक कालावधीत बँकेचा कमी झालेला एनपीए, तोटा कमी करून झालेला नफा, वाढलेल्या ठेवी, कर्ज वाटपात झालेली वाढ व बिगरशेती कर्ज थकीत वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नाचा उल्लेख करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

डीसीसीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात यावी, अशी याचिका मंगळवेढा तालुक्यातील बावची विकास सोसायटीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी झाली नाही. निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत सहकार खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी डीसीसी प्रशासकांना शपथपत्र दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी संचालक निवडीसाठी १ जुलै २६ रोजी अर्हता दिनांक गृहीत धरून मतदार याद्या करण्यात याव्यात. तसेच निवडणूक खर्च निधी म्हणून १० लाख रुपये निवडणूक प्राधिकरणाला देण्याचे प्रशासकांना आदेश दिले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button