ह. भ. प. संजीवनीताई शिंगाडे, नातेपुते यांचे गोरडवाडी येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. आबाजी कर्णवर पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
गोरडवाडी (बारामती झटका)
कै. आबाजी यशवंत कर्णवर पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाचे आयोजन बुधवार दि. १५/७/२०२६ रोजी कर्णवर पाटील वस्ती, गोरडवाडी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ह. भ. प. संजीवनीताई शिंगाडे, नातेपुते यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांना मृदंगाचार्य विशाल महाराज जाधव आणि गायनाचार्य ह. भ. प. सुवर्णादीदी जमादार यांची साथ असणार आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. पंढरीनाथ आबाजी कर्णवर पाटील, श्री. सदाशिव आबाजी कर्णवर पाटील, श्री. महादेव आबाजी कर्णवर पाटील, श्री. उत्तम आबाजी कर्णवर पाटील, श्री. हनुमंत आबाजी कर्णवर पाटील, श्रीमती नागरबाई नानासो कर्णवर पाटील, श्रीमती कमल तुकाराम कर्णवर पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

घाई गडबडीत नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त कर्णवर पाटील परिवार व समस्त ग्रामस्थ, गोरडवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



