ताज्या बातम्यासामाजिक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विजयवाडी गावचा अनेक वर्षाचा प्रलंबित स्मशानभूमीचा प्रश्न सोडविला…

मुंबई (बारामती झटका)

मौजे विजयवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्रालयात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. जयकुमार गोरे भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी, ग्रामस्थ, पदाधिकारी व मान्यवरांसमवेत सविस्तर बैठक पार पडली.

विजयवाडी गावातील नदी व गावठाणाची शासकीय जागा उपलब्ध नसल्याने इरिगेशन कॅनॉललगत जागेवरील अतिक्रमण हटवून ती जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, ज्या गावांमध्ये स्मशानभूमी किंवा दफनभूमीसाठी शासकीय अथवा ग्रामपंचायतीची जागा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत खाजगी जमीन संपादित करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी विजयवाडी येथे अतिक्रमण हटवून जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रस्ताव प्राप्त होताच त्यावर सकारात्मक व तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे मा. मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.

या बैठकीस ग्रामविकास विभागातील अधिकारी तसेच विजयवाडी येथील तात्या रामा वाघमोडे, रणजीत ठवरे पाटील, राजू शंकर शिंदे, बाबू शंकर वाघमोडे, व्यंकटराव मारुती वाघमोडे, गुलाब मारुती शिंदे, बाबुराव शिंदे, शंकर दगडू शिंदे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button