ताज्या बातम्याराजकारण

राजाभाऊ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन माळशिरसकर योग्य वेळी जनतेची सेवा करण्याची संधी देतील – मा. नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख..

डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या माळशिरस येथील संपर्क कार्यालयात भाजपचे शहर उपाध्यक्ष राजाभाऊ वळकुंदे यांचा वाढदिवस साजरा….

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीसोबत अनेक वर्ष प्रामाणिक व निष्ठेने राहून समाजामध्ये सामाजिक व राजकीय कार्य अविरतपणे सुरू आहे. राजाभाऊ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन माळशिरसकर योग्य वेळी जनतेची सेवा करण्याची संधी देतील, असे भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी सांगितले. माळशिरस शहर उपाध्यक्ष राजाभाऊ वळकुंदे यांचा वाढदिवसानिमित्त संपर्क कार्यालयामध्ये सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा कार्यकारणी सदस्य राहुलजी पद्मन, गणेश बोराटे, बाबासाहेब माने, योगेश शिंदे, बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

राजाभाऊ यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी आहे. समाजामध्ये वावरत असताना वडीलधाऱ्यांचा सन्मान, लहानांचा आदर अशा पद्धतीने वावर असतो. सोज्वळ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची मित्रपरिवार व नातेवाईक यांच्यामध्ये वेगळी ओळख आहे.

आजपर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे ते पार पाडत आहेत. यामुळे पक्षीय वरिष्ठ नेतृत्वामध्ये सुद्धा राजाभाऊ यांना मानाचे स्थान आहे. उद्योग व्यवसायामध्ये आपली प्रगती करून सामाजिक व राजकीय कार्य सुरू आहे. निश्चितपणे सामाजिक कार्याची दखल घेऊन माळशिरसकर योग्य वेळी संधी देतील, असेही मित्रपरिवार व नातेवाईक यांच्यामधून बोलले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button