“वारी परंपरेची – वारी संस्कृतीची आणि श्रद्धेची, वारी भक्तीभावाची – वारी शिक्षणाची अविरत चालणारी”

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकते – पाटीलवस्ती (धानोरे) येथील बाल – दिंडी सोहळा
धानोरे (बारामती झटका)
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकते – पाटीलवस्ती (धानोरे) येथे पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून हातात टाळ, डोक्यावर तुळशी वृंदावन व पालखी घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. या दिंडी सोहळ्यास शालेच्या परिसरात सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरेचे संस्कार रुजावेत, संत परंपरेची ओळख व्हावी आणि भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. घरोघरी पालखीचे पूजन व बालवाकऱ्यांना पोहे, चहा, दुध, चिप्स, राजगिरा लाडू, चिक्की, बिस्किटे, फरसाणा, चिरमुरे इ. नाष्टा म्हणून वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापक प्रदीप आवताडे, सहशिक्षिका स्वाती मांजरे अंगणवाडी सेविका मदतनीस व सर्व पालक यांनी केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे मुलांमध्ये संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव विकसित होत असल्याचे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले.

या वेळी माजी सरपंच सुरेश देवकते, बाळासाहेब देवकते, महादेव देवकते (मेजर), सुशील देवकते, अर्जुन हाके, नवनाथ देवकते, हनुमंत देवकते, चंद्रकांत भुसारे, सुरज टिक, सुनिल टिक, अशोक टिक, गुंडिबा देवकते सेवानिवृत्त सहकारी शिक्षक नामदेव ढेरे यांचेसह शैला देवकते, सुनंदा देवकते, ताई कोठावळे, सुवर्णा देवकते, आम्रपाली बनसोडे, अश्विनी टिक, प्रियंका टिक, नकुसा देवकते, स्वाती देवकते, अनिता देवकते, संगिता देवकते, वैशाली देवकते, दामिनी देवकते जिजा देवकते, इंदुमती टिक, दिपाली देवकते, सुशिला देवकते, शारदा देवकते, लक्ष्मी देवकते, सुवर्णा देवकते, अमृता देवकते, प्रियंका देवकते, अश्विनी भुसारे या महिला भगिनी सह पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी दिंडी सोहळा आयोजन व नियोजन करण्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



