भाजपच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गणेश नागनाथ चिवटे यांची नियुक्ती…

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी नियुक्ती केली तर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी नियुक्तीचे पत्र दिले…
मुंबई (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गणेश नागनाथ चिवटे यांची नियुक्ती केलेली आहे. सदर नियुक्तीचे पत्र माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गणेश चिवटे यांना दिलेले आहे..

गणेश चिवटे सरचिटणीस पदावर काम करीत होते. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरणाची पाळेमुळे रुजवण्यासाठी चांगले काम केलेले होते. करमाळा तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यात त्यांचे योगदान आहे. ते सध्या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती श्री. चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागी गणेश चिवटे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



