वाघोली येथील सौ. विभावरी माने शेंडगे यांचे दुःखद निधन

पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांना पत्नीवियोग…
वाघोली (बारामती झटका)
सौ. विभावरी भारत माने शेंडगे रा. वाघोली, ता. माळशिरस यांचे दि. 30/7/2026 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 54 व्या वर्षी दुःखद निधन झाले. विभावरी माने शेंडगे ह्या खामगाव धाराशिव चे पंडितराव पाटील यांच्या कन्या व वाघोली गावचे माजी सरपंच बलभीमराव शेंडगे यांच्या सून व पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत बलभीम शेंडगे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व पती, सासूबाई असा परिवार असून त्यांचे वर भीमा नदीकाठी राहते घरासमोर त्यांचे शेतात अंतिम संस्कार करण्यात आले.
सदर अंतिम संस्कारावेळी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, हजारे साहेब, सेवा निवृत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवा निवृत अति, मुख्य कार्यकरी अधिकारी शितोळे साहेब, धाराशिव चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे साहेब तसेच जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा परिषद पुणे चे अधिकारी, कर्मचारी, वाघोली गावातील ग्रामस्थ व माने शेंडगे परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अस्थी विसर्जन (तिसरा )विधी शनीवार दि. 1 ऑगस्ट रोजी राहते घरासमोर सकाळी 7.15 वाजता होईल.
सौ. विभावरी माने शेंडगे यांच्या अचानक जाण्याने माने शेंडगे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर माने शेंडगे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो. आणि सौ. विभावरी माने शेंडगे यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



