ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

गोपाळराव देव प्रशालेत DYSP श्री. प्रदीप गोरड यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन…

माळशिरस (बारामती झटका)

श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्था संचलित गोपाळराव देव प्रशाला व ज. चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालय माळशिरस सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ श्री. प्रदीप दुर्योधन गोरड DYSP/ACP यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दि. 07/08/2026 रोजी सकाळी 08.30 वाजता आयोजित केला आहे.

या गुणगौरव समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपले स्नेही हनुमान शिक्षण प्रसारक संस्था माळशिरस अध्यक्ष ॲड. माधव कृ. मिरासदार, कार्याध्यक्ष ॲड. मिलिंद वि. कुलकर्णी, गोपाळराव देव प्रशाला व ज. चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, माळशिरस प्राचार्य श्री. सूर्यकांत एस. जानकर यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सदरचा कार्यक्रम गोपाळराव देव प्रशाला व ज. चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालय माळशिरस, जि. सोलापूर येथे होणार आहे. पाऊस आल्यास सदरचा कार्यक्रम सुमंगल कार्यालय अकलूज रोड माळशिरस येथे होईल असेही कळविण्यात आलेले आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button