माळशिरस नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन शुभारंभ….

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते मा. नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार….
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते रविवार दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी माळशिरस नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे. सदर भूमिपूजन समारंभ भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
श्री स्वामी समर्थ मंदिर गायकवाड प्लॉटिंग माळशिरस येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा भूमिपूजन सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे खंडोबा वस्ती ५८ फाटा माळशिरस येथे श्री स्वामी समर्थ सभा मंडपाचा भूमिपूजन सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे..


माळशिरस तालुक्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तिगत समवयस्क लोकांमध्ये एकमेकांचा विचारांचा सहवास व रहिवास एकत्र असावा, असा उदात्त हेतू नगर परिषदेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने स्तुत्य उपक्रमाचे भूमिपूजन होत आहे. तसेच महिलांसाठी सुद्धा श्री स्वामी समर्थ सभा मंडपाचा उपयोग चांगल्या पद्धतीने होणार आहे. महिलांचे सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रम करण्याकरता श्री स्वामी समर्थ सभा मंडपाचे नियोजन सुद्धा महिलांच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक व महिला भगिनी यांच्यामध्ये समाधानाचे आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे..


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



