कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते भाग्यलक्ष्मी अर्बन वुमन क्रेडिट सोसायटी माळशिरस शुभारंभ होणार…

माळशिरस शहरात पहिल्यांदाच भाग्यलक्ष्मी अर्बन वुमन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, माळशिरस या नवीन पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते शनिवार दि. 22/08/2026 रोजी सायंकाळी 05 वाजता भाग्यलक्ष्मी अर्बन वुमन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, माळशिरस या नवीन पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. सदरच्या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व माळशिरसच्या माजी सरपंच ॲड. संजीवनीताई पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माळशिरसचे माजी सरपंच मिलिंददादा कुलकर्णी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूज चे सहाय्यक निबंध पी. आर. सारडा, माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुमित सावंत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नक्षत्र (गणेश) कॉम्प्लेक्स, म्हसवड रोड, माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे संस्थापक चेअरमन ॲड. रेश्माताई सूर्यकांत टेळे, व्हाईस चेअरमन लता बाळासाहेब सरगर, संचालक डॉ. सरस्वती दत्तात्रय वाघमोडे, सौ. सविता अर्जुन राऊत, सौ. छाया अमित दोशी, सौ. प्रतीक्षा मोहन टेळे, सौ. वर्षा नाना दडस, सौ. शितल दत्तात्रय वळकुंदे, सौ. दिपाली कैलास वामन, सौ. मनीषा बाळासाहेब राऊत, सौ. जयश्री चंद्रकांत मगर, सौ. ताई अनंतराव शेंडगे, सौ. कल्पना उत्तम सिद यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे..


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



