ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

विनोद बाबर यांना पीएच.डी. प्रदान, वनौषधींच्या संवर्धनावर संशोधन

पानीव (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील निमअर्धशुष्क प्रदेशातील दुर्मिळ व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या प्रसार व संवर्धनावर संशोधन केल्याबद्दल श्रीराम महिला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद बाबर यांना अलवर विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना डॉ. उत्तम सिंग यांचे मार्गदर्शन मिळाले.

त्यांनी ‘सोलापूर जिल्ह्यातील निमअर्धशुष्क प्रदेशातील दुर्मिळ व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा प्रसार’ या विषयावर संशोधन केले. या संशोधनामध्ये अश्वगंधा, शतावरी आणि सफेद मुसळी या महत्त्वपूर्ण औषधी वनस्पतींच्या प्रसार, संवर्धन, लागवड तसेच त्यांच्या वाढीसाठी आवश्यक विविध घटकांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्याची निमअर्धशुष्क भौगोलिक परिस्थिती, मर्यादित पाण्याची उपलब्धता आणि औषधी वनस्पतींची वाढती मागणी लक्षात घेता या वनस्पतींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन व उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या संशोधनाचा उपयोग शेतकरी, औषधी वनस्पती उत्पादक तसेच भविष्यातील संशोधकांना होऊ शकतो.

डॉ. विनोद बाबर यांच्या या यशाबद्दल श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील, उपाध्यक्ष करण पाटील, सचिव ॲड. अभिषेक पाटील यांच्यासह संपूर्ण श्रीराम परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button