माळशिरस पोलीस स्टेशनच्या मोहिमेमुळे बेशिस्त व नियमबाह्य वाहनधारकांना चपराक.

माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी DYSP विशाल नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी डीवायएसपी विशाल नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. माळशिरस शहरात मुख्य रस्त्यावर चौकाचौकांत वाहनांची तपासणी सुरू आहे. चालकाकडे लायसन क्षमतेपेक्षा जास्त ट्रिपल सीट, मागेपुढे नंबर प्लेट अशा सर्व बाबींच्या तपासणी मोहिमेमुळे बेशिस्त व नियमबाह्य वाहनधारकांना चांगला चपराक बसलेला आहे.

माळशिरस शहरांमध्ये तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालय, वनविभाग कार्यालय, जिल्हा सत्र व दिवाणी फौजदारी न्यायालय, शिक्षण संस्था, बाजारपेठ, आठवडा बाजार यासाठी तालुक्यातील नागरिकांचा माळशिरस शहराशी दैनंदिन संपर्क येत असतो. माळशिरस शहरामधून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आहे. जरी माळशिरस शहराच्या बाहेरून पालखी महामार्ग गेला असला तरीसुद्धा माळशिरस शहरामधून अनेक वाहनधारक प्रवास करीत असतात. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा भंग करून काही वाहनधारक विना लायसन, विना नंबर प्लेट वाहन चालवणे, हाय स्पीडने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त, दोन प्रवासी पेक्षा जास्त प्रवासी बसवणे अशा अनेक बाबींच्या पोलीस प्रशासनाकडून मोहीम सुरू आहे.

सदरच्या मोहिमेमुळे वाहनधारकांना शिस्त लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होत असते. पायी चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व लहान मुलांना वाहनांचा त्रास कमी होतो.

लहानांपासून थोरांपर्यंत आनंद उत्सव असणारा गणेशोत्सव लवकरच येत आहे. अशावेळी वाहनधारकांवर निर्बंध असणे गरजेचे आहे. यामुळे माळशिरस पोलीस स्टेशनचे डीवायएसपी नवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या स्तुत्य उपक्रमाचे जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



