ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

माळशिरस तालुक्याच्या पूर्व दक्षिण भागात श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा…

निसर्गाच्या ऋतुचक्रात वरूणराजा अडकला, शेतकरी दुखावला मात्र, माजी आमदार राम सातपुते यांच्या कृतीमुळे शेतकरी सुखावला…

वेळापूर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात आषाढ महिन्यामध्ये देवयानी एकादशीनंतर बेंदूर सण साजरा केला जातो. माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात श्रावणी बैलपोळा साजरा केला जातो. माळशिरस तालुक्याच्या पूर्व दक्षिण भागात वेळापूर व पिलीव जिल्हा परिषद गटात श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा केला जात आहे. बैलपोळा सणाला शेतकऱ्यांचा नंदी गाय, म्हैस व इतर प्राण्यांना पाण्याने स्वच्छ धुऊन शेंगांना शेंदूर लावून बेगड लावले जाते. शिंगामध्ये गोंडे लावले जातात. अंगावर रंगाच्या वेगवेगळ्या छटा काढल्या जातात. बैलांच्या पाठीवर झुली, मस्तकावर बाशिंग, गळ्यामध्ये घुंगराचा चाळ, अशा पद्धतीने सजवून गावांमधून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर बळीराजा आपल्या आवडत्या बैलांना गोड नैवेद्य दाखवून स्वतः गोड भोजनाचा आस्वाद घेत असतात..

वेळापूर परिसरामध्ये बैलपोळा सणानिमित्त खरेदी करण्याकरता बळीराजाची लगबग सुरू आहे. आपली जनावरे पाण्याने धुऊन स्वच्छ करण्याकरता ओढ्यावर घेऊन जात आहेत.

निसर्गाच्या ऋतुचक्रात वरूणराजा अडकला आहे. सात जूनला मृग नक्षत्र निघाले असून म्हणावा तसा माळशिरस तालुक्यामध्ये पाऊस पडलेला नाही. विशेष करून माळशिरस तालुक्याच्या पूर्व दक्षिण भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी म्हणावा असा समाधानी नाही. दुखावला आहे मात्र, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने 14 वर्षांपासून बंद असलेला एस्केप सुरू केलेला आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्याच्या पूर्व दक्षिण भागातील पिलीव, सुळेवाडी, कुसमोड, मळोली, वेळापूर, शेंडेचिंच, तोंडले, बोंडले, उघडेवाडी अशा अनेक गावांना फायदा झालेला आहे. अनेक गावांमध्ये कॅनल मधून पाणी सोडलेले आहे.

उघडेवाडी, मळोली, वेळापूर अशा गावांमध्ये जलपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडलेले आहेत. लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे‌ पाळीव जनावर यांना पाण्याचा उपयोग झालेला असल्याने कामाचा माणूस राम सातपुते यांच्याविषयी बळीराजामध्ये आत्मीयता व प्रेम निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button