चि. सौ. कां. सोनाली वाघमोडे, भांबुर्डी आणि चि. गणेश पिंगळे, तरंगफळ यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक
श्री. आण्णासो पांडुरंग वाघमोडे
श्री. अजित भरत बोरकर
अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका
भांबुर्डी (बारामती झटका)
कै. पांडुरंग नारायण वाघमोडे यांची नात व श्री. राजकुमार पांडुरंग वाघमोडे, रा. भांबुर्डी, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. सोनाली आणि कै. साहेबराव रामा पिंगळे यांचे नातू व श्री. नानासो साहेबराव पिंगळे, रा. तरंगफळ, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. गणेश यांच्या शाही शुभ विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दि. १३/९/२०२६ रोजी दुपारी २ वाजून ०५ मि. या शुभमुहूर्तावर मातोश्री मंगल कार्यालय, अकलूज शिवामृत रोड, विझोरी नजीक, चौंडेश्वरवाडी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक श्री. आण्णासो पांडुरंग वाघमोडे, श्री. अजित भरत बोरकर तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना अक्षतारूपी आशीर्वाद देण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन आपले नम्र सौ. गोकुळा व श्री. आण्णा पांडुरंग वाघमोडे, श्री. प्रकाश पांडुरंग वाघमोडे, सौ. बबुताई व श्री. राजकुमार पांडुरंग वाघमोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



