खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन वेळी रुग्ण का दगावतात ? रुग्णांसह नातेवाईकांच्या मनात संभ्रम…

भूलतज्ञांची चूक भुल होते, का ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांची भूल होते, संशोधनाचा विषय आहे, माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे…
अकलूज (बारामती झटका)
शासकीय रुग्णालय व दवाखाने यामध्ये उपचार व्यवस्थित होत नाही, असा गोड गैरसमज करून अनेक रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन वेळी रुग्ण का दगावतात, रुग्णांसह नातेवाईकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असतो. ऑपरेशन करतेवेळी भूल महत्त्वाची असते. भुलतज्ञांची चूक भूल होते, का ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांची भूल होते, हा संशोधनाचा विषय आहे. अनेकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था असल्याने सदरची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे..
खाजगी हॉस्पिटलमध्ये सुविधा व मशिनरी उपलब्ध नसताना डॉक्टर ऑपरेशन करण्याची रिस्क का घेत असतात. अनेक डॉक्टरांचे शिक्षण व अनुभव कमी असताना मोठ्या ऑपरेशनच्या वेळी रुग्ण हाताबाहेर जात असतात. त्यावेळी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नंतर उपचारासाठी नेले जाते. त्यावेळी काही रुग्णांचे बरे वाईट सुद्धा झालेली असते. अशावेळी नातेवाईकांनी कोणता निर्णय घ्यावा असाही प्रश्न पडत असतो. अनेक खाजगी दवाखाने बॉम्बे नर्सिंग ऍक्ट प्रमाणे नसतात हॉस्पिटल मधील सुविधा अनुभवी डॉक्टर नर्सिंग स्टॉप कंजस्टेड जागा अशा अनेक बाबी नसल्यामुळे रुग्ण देवाघरी जात असतात.
महिलांच्या बाबतीत सर्रास सिजर केले जात आहे. गरोदरपणामध्ये सोनोग्राफी केली जाते. त्यावेळेस बाळासह गर्भाशय सुस्थितीत असते. मात्र डिलिव्हरीच्या वेळी डॉक्टर सांगतात, बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा पडलेला आहे. बाळ उलटे आलेले आहे. गर्भाशयातील पाणी कमी होत आहे. बाळाचे श्वास ठोके कमी चालत आहे, असे नातेवाईकांना सांगून डिलिव्हरीचे सिजर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

पूर्वीच्या काळी नॉर्मल डिलिव्हरी होत होत्या. आत्ता सिजर करण्याची जणू काही फॅशनच निघाली आहे, अशी जुन्या महिलांमधून चर्चा सुरू असते. इतर ऑपरेशन वेळी रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टर लोक एकमेकांवर दोष देत असतात. अशा सर्व गोष्टींची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. असे प्रकार कोणावर झाले असतील तर त्यांनी बारामती झटका संपादक श्रीनिवास वेणूबाई शिवाजीराव कदम पाटील यांच्याशी 98 50 10 49 14 या नंबर वर संपर्क साधावा..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



