आरोग्यताज्या बातम्यासामाजिक

पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व खाजगी हॉस्पिटलमध्ये दरपत्रक शुल्क आकारले जाणारे दरफलक तात्काळ लावण्यात यावे, शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी

पंढरपूर (बारामती झटका)

पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक गोरगरीब कष्टकरी कुटुंबीयांची डॉक्टरी पेशातील काही स्वार्थी प्रवृत्ती कडून अक्षरक्ष: लूट होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. त्याबाबत शिवबुध्द युवा प्रतिष्ठान प्रणित, शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेकडे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे अनेक नागरिक आपल्या वेदना व तक्रारी व्यक्त करताना दिसून येतात. त्यांना पंढरपूर शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये (दवाखान्यात) आलेला अनुभव कथन करताना जनतेच्या, रूग्ण व नातेवाईक यांच्या विविध अडचणी लक्षात घेवून शिवबुध्द युवा प्रतिष्ठान प्रणित, शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य आपणाकडे खालील मागण्यांबाबत निवेदन सादर करीत आहे.

पंढरपूर शहर तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल सर्व दवाखान्यांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या नदरपत्रक शुल्काचे फलक लावले जावेत. रुग्ण दवाखान्यात दाखल होताच त्यास प्रतिदिन आकारण्यात येणारे नर्सरी शुल्क, बेड चार्जेस, डॉक्टरांची तपासणी फी, आय सी यु, विषेश, स्पेशालिटी डॉक्टर, एक वेळीची व्हीजीन फी यांची तपशीलवर माहिती रुग्णास दिली पाहिजे.

शासनाच्या नियमानुसार धर्मादाय व खाजगी रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव बेड ठेवण्याची तरतूद आहे. यांची अंमलबजावणी होत नाही तरी याबाबत सर्वच खाजगी हॉस्पिटल रुग्णालयांना सर्व ते आदेश देण्यात यावेत.

काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने एक आदेश काढलेला आहे की, सामान्य रुग्णालयांना उपचारासाठी त्यांच्या आरोग्याला सुविधा मिळण्यासाठी रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील सर्वच खाजगी रुग्णालय दवाखान्यांमध्ये दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले आहे. रुग्णांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार आणि अन्य औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब, आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी आदेश काढलेला आहे. सध्या तरी पंढरपूर शहरातील तालुक्यातील कोणत्याही खाजगी हॉस्पिटल दवाखान्यामध्ये दरपत्रक लावलेले दिसत नाही. तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल आहेत त्या मेडिकल मधून गोळ्या औषध घेण्यासाठी रुग्णांना हॉस्पिटलने बंधनकारक करू नये. जे हॉस्पिटल नियमाचे पालन करणार नसेल तर त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

पंढरपूर शहरातील आरोग्य विभागाचे वैद्यकीय मुख्यअधिकारी यांनी पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सर्व हॉस्पिटल यांना दरपत्रक बंधनकारक करून त्यांना आदेश देण्यात यावा. जे रुग्णालय हॉस्पिटल दवाखान्यांमध्ये दरपत्रक लावणार नसेल तर त्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्यात यावा. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान प्रणित, शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने पंढरपूर आरोग्य विभाग मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे आम्ही निवेदन मार्फत मागणी केली आहे. या आठ दिवसांत शासनाच्या नियमांचे पालन खाजगी हाॅस्पिटल दरपत्रक शुल्क आकारले फलक नाही लावले तर आम्ही शहर व तालुक्यातील सर्व दवाखान्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे. यांची दखल वैद्यकीय मुख्यअधिकारी पोलीस प्रशासनाने द्यावी. असा शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील यांनी दिली आहे.

टिप
1) दरपत्रक मराठी आणि इंग्रजीत प्रदर्शित करण्यात बंधनकारक आले आहे.
२) आरोग्यसेवेत पारदर्शकता हवीच, रूग्णांना त्यांच्या भाषेत दरपत्रक आणि माहिती मिळणे बंधनकारक आहे

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button