ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा – संपादक श्रीनिवास कदम पाटील

माळशिरस (बारामती झटका)

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आणि यंदा लढत पुन्हा एकदा चुरशीची होणार आहे.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा मिळून हा मतदार संघ बनतो.
या मतदार संघात जवळपास 3 लाखांहून अधिक नोंदणीकृत पदवीधर मतदार आहेत.

यंदा विद्यमान आमदारांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जागा रिक्त होत आहे. या निवडणुकीत फक्त पदवीधरच मतदान करू शकतात आणि मतदान करण्यासाठी पदवीधर नोंदणी बंधनकारक आहे. अनेक तरुणांची पदवी पूर्ण झाली आहे, पण त्यांनी अजूनही नाव नोंदणी केलेली नाही. त्यामुळे जर तुम्ही पदवीधर असाल आणि तुमचं नाव अजून नोंदवलं नसेल, तर लवकरच निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म 18 भरा.

पुणे पदवीधर मतदार संघात माळशिरस तालुक्यातील वेळापूर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वेळापूर येथे मतदानाचा हक्क बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी बजावला.

मतदान हा आपला अधिकार तर आहेच, पण ते आपले कर्तव्यही आहे. सर्व पदवीधर आणि शिक्षक बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे की, आपण आज आवर्जून मतदान करा आणि लोकशाही अधिक बळकट करा.
श्रीनिवास वेणूबाई शिवाजीराव कदम पाटील
संपादक बारामती झटका
वेब पोर्टल युट्युब चॅनल
मु. पो. मळोली ता. माळशिरस जि. सोलापूर.
मोबा 9850104914..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button