नगराध्यक्ष समशेरसिंह यांची हिंदकेसरी संजीवराजे यांच्या समवेत जिल्हा बँकेत लढत….

महाराष्ट्र केसरी अनिकेतराजे यांच्यावर नगरपरिषदेच्या रणांगणात विजय मिळवून समशेरसिंह नगराध्यक्ष बनले .
फलटण (बारामती झटका)
विधान परिषदेचे माजी सभापती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक खात्याचा पदभार सांभाळलेले राजकारणातील दिग्गज नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव तथा राजकारणातील महाराष्ट्र केसरी अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नगरपरिषदेच्या अटीतटीच्या व चुरशीच्या रंगतदार निवडणुकीच्या रणांगणात दैदीप्यमान विजय मिळवून समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर थेट जनतेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष बनले होते. फलटण नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत श्रीमंत रामराजे यांचे बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा राजकारणातील हिंदकेसरी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत जिल्हा बँकेत लढत लागल्याने फलटण, सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे…
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अनेक संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर बिनविरोध संचालक झालेले आहेत. फलटणच्या इतिहासात पहिल्यांदाच सहकार क्षेत्रात रणजीतदादांनी पाऊल ठेवून बिनविरोध संचालक होण्याचा बहुमान मिळवलेला आहे..

फलटण शहर व तालुक्यामध्ये रामराजे गटाचे अस्तित्व संपवत आणलेले आहे. फलटण कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील, फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती सभापती कु. शिवांजली भोसले, त्यांच्यासह अनेक ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी दूध संस्था या ठिकाणी रणजीतदादांनी आपल्या विचारांच्या लोकांना सोबत घेऊन मानाचे स्थान दिलेले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणूक 2026-27 ते 2031-32 या कालावधीतील निवडणुकीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना उतरवले आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था यामध्ये निवडणूक लागलेली आहे. 131 मतदार आहेत.
आज रविवार दि. 1 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळ पासून सायंकाळपर्यंत मतदान होणार आहे. फलटणच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगतदार निवडणूक समशेरसिंह यांच्या माध्यमातून लागलेली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत रामराजे यांचे पुत्र राजकारणातील महाराष्ट्र केसरी अनिकेत राजे यांच्यावर विजय मिळवून नगराध्यक्ष बनलेले समशेरसिंह यांची रामराजे यांचे बंधू राजकारणातील हिंदकेसरी संजीवराजे यांच्या समवेत जिल्हा बँकेत लढत असल्याने महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



