“रोहित पवार म्हणजे, लबाड लांडगा ढोंग करतंय आणि शेतकऱ्यांच्या आडून सोंग करतंय” – आ.देवेद्र कोठे

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूरच्या उजनी धरणात होणाऱ्या एआय सेंटरला होत असलेल्या विरोधाच्या समर्थनार्थ सोलापुरात आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कुंडल यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोठे यांनी रोहित पवार यांच्यावर तोफ डागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सोलापूरचा विकास होत असताना जनतेची दिशाभूल करून, विकासाला विरोध करून लोकांमध्ये खोटा नरेटीव्ह पसरवण्याचे काम महाराष्ट्रातला एक आमदार रोहित पवार करत आहे.
हा रोहित पवार म्हणजे “लबाड लांडगा ढोंग करतंय आणि शेतकऱ्यांच्या आडून सोंग करतंय”. या आमदाराची राजकीय आणि पक्षाची कारकीर्द पाहिली तर महाराष्ट्रातील प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याचे काम रोहित पवार करत आहे. शक्तिपीठ महामार्ग असेल, समृद्धी महामार्ग असेल, मेट्रो असेल आता उजनी वरील एआय डेटा सेंटर असेल अशा विकास प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका हे घेतात.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 365 दिवसाला अडीच टीएमसी पाण्याची गरज असते. हा एआय डेटा सेंटर प्रकल्प झाल्यास उजनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन तीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे सोलापूरला 365 दिवस 24 तास पाणी मिळेल. मात्र लोकांमध्ये खोट्या अफवा पसरवून सोलापूरला या प्रोजेक्टमुळे पंधरा दिवसाला एकदा पाणी मिळेल असे हे सांगत आहेत. पण नेता जितका बेअक्कल त्याचे कार्यकर्ते तितकेच महाबेअक्कल अशी टीका कोठे यांनी यावेळी केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
#rohitpawar #DevendraKothe #jaykumargore #devendrakothe #SachinKalyanshetti #AIDataScience #baramatizatka #ujniwatar #shrinivaskadanpatil #solapur #tembhurni



