पालकमंत्री जयकुमार गोरे माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या दीपावली स्नेहभेट व फराळ कार्यक्रमास उपस्थित राहणार…

भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या स्नेहभेट व दीपावली फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार कमल भगवानराव गोरे यांचा सोमवार दि. 9 नोव्हेंबर 2026 रोजी सातारा, सोलापूर जिल्हा शासकीय दौरा जाहीर झालेला आहे. पंढरपूर तालुक्यातील सोनके गावामध्ये ऊसतोड मजूर यांच्या समवेत दिवाळी फराळ करून पंढरपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सफाई कामगार सन्मान व त्यांच्या समवेत दिवाळी फराळ करून मंगळवेढा येथील रड्डे येथे शेतकरी कुटुंबाच्या घरी शेतकऱ्यांच्या समवेत दिवाळी फराळ करून दुष्काळाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसमवेत संवाद साधणार आहेत. त्यानंतर माळशिरस शहरात भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांनी दीपावली निमित्त स्नेहभेट व दीपावली फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. 09/11/2026 रोजी दुपारी 12 ते 06 या वेळेमध्ये श्रीनाथ विद्यालय, शिक्षक कॉलनी, म्हसवड रोड, माळशिरस येथे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सदरच्या कार्यक्रमास दुपारी तीन वाजता उपस्थित राहून शासकीय मोटारीने कमलकुंज निवासस्थानी बोराटवाडी येथे रवाना होणार आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये सणांचा राजा म्हणून दीपावली या सणाकडे पाहिले जाते. वसुबारस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशी दीपावलीच्या सणांमध्ये विशिष्ट दिवसाला वेगळे महत्त्व असते. गरिबातील गरीब व श्रीमंतातील श्रीमंत असणारे या दीपावली सणाला घरोघरी आपापल्या पद्धतीने गोडधोड करून सण साजरा करतात. अनेकजण नोकरी, उद्योग, व्यवसाय यामुळे बाहेरगावी असतात. आवर्जून या सणाला प्रत्येकजण आपापल्या गावांमध्ये येत असतात. अनेकांच्या भेटीगाठी होत असतात, हाच उदात्त हेतू ठेवून डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी आनंदमय, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त मित्रपरिवार व नातेवाईक यांचा सुसंवाद व्हावा, त्यांच्या परिवारामध्ये नववर्ष आनंदी भरभराटीचे प्रगतीचे व आरोग्यदायी जावो अशा पद्धतीने ईश्वरास प्रार्थना करून स्नेहभेट व दीपावली फराळ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

तरी मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे असे आयोजक भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले होते. दीपावली स्नेहभेट व फराळाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळी, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने डॉ. आप्पासाहेब देशमुख मित्रपरिवार व संयोजन समितीच्या वतीने सुसज्ज नियोजन करण्यात आले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



