ताज्या बातम्याराजकारण

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यात रुजण्यास सुरुवात…

प्रस्थापित अकलूजच्या मोहिते पाटील शाहीला लगाम बसवला…

अकलूज (बारामती झटका)

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न, बोधिसत्व, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यात रुजण्यास सुरुवात झालेली आहे.

प्रस्थापित अकलूजच्या मोहिते पाटील शाहीला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी मोहिते पाटील शाहीला लगाम बसवला असल्याने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या मनातील अनेक दिवसांपासून असणारी इच्छा पूर्ण झालेली असल्याने अनेक पीडित, शोषित व वंचित असलेल्या लोकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

“मोहिते पाटील बोले आणि तालुका हाले” – आता इतिहास जमा!
माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील बोले आणि तालुका हाले, अशी राजकीय परिस्थिती होती. माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्यामध्ये मोहिते पाटील यांचे राजकीय वजन होते. दिवसेंदिवस राज्यात व जिल्ह्यात ते कमी झालेले दिसत आहे, मात्र तालुक्यात वर्चस्व कायम राहिलेले होते. त्याला खरे कारण विरोधक सक्षम नसल्यामुळे मोहिते पाटील यांचे माळशिरस तालुक्यामध्ये एकाधिकारशाही राजकारण चालत होते.

मात्र महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, रामभाऊ सातपुते यांनी मोहिते पाटील यांचे राजकारण जखडून ठेवलेले आहे.

राम सातपुते यांच्या रूपाने खमकं नेतृत्व…
माळशिरस तालुक्याला आरोग्यदूत राम सातपुते यांच्या रूपाने खमकं व विश्वासू नेतृत्व मिळालेले आहे. त्यामुळे अनेकजण मोहिते पाटील यांच्या समवेत दोन-दोन, तीन-तीन पिढ्या राजकारण करीत असलेले मोहिते पाटील यांना सोडून राम सातपुते यांच्याबरोबर राजकारण करीत आहेत.

माळशिरस तालुक्यात राम सातपुते यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठे जाळे निर्माण केलेले आहे. आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये राम सातपुते एवढे मोठे आव्हान कोणीच दिलेले नव्हते. त्यामुळे मोहिते पाटील यांचे राजकारण दुपळीवर चालत होते. आता राजकारणाची पद्धत राम सातपुते यांच्यामुळे बदललेली आहे. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा विश्वास संपादन करून राम सातपुते यांचा राजकीय प्रवास सुरू आहे.

योद्धा शरण येत नसल्यानंतर बदनाम केला जातो!
योद्धा शरण येत नसल्यानंतर बदनाम केला जातो, हेच राजकीय षडयंत्र डोक्यात ठेवून मोहिते पाटील राम सातपुते यांच्यावर गरळ ओकत आहेत. मात्र याचा उलट परिणाम होत आहे. राम सातपुते यांची प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत चाललेली आहे.

ज्याप्रमाणे सोन्याला भट्टीमध्ये तापवून गरम केल्यानंतर सोन्याला चकाकी येते, त्याचप्रमाणे राम सातपुते यांचे दिवसेंदिवस सर्वसामान्य व गोरगरीब जनतेमध्ये आदराचे स्थान वाढत आहे, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button